कृषीवार्ता

कुकाणा परिसरात अवकाळी पावसाने झोडपले..

अस्मानी संकटाने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान.... काही ठिकाणी गरपीटसह विजही कोसळल्या..

कुकाणा परिसरात अवकाळी पावसाने झोडपले..
अस्मानी संकटाने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान….
काही ठिकाणी गरपीटसह विजही कोसळल्या...

कुकाणा प्रतिनिधी-(सोमनाथ कचरे )
वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा मोठा फटका नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. सर्वाधिक दीड तास जोरदार कुकाणा परिसरात पावसामुळे गहू, , कांदा मका भाजीपाला,या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही प्रमाणात गरपीट झाल्याने काढणीला आलेल्या गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अचानक वातावरण बदलल्याने अवकाळी पाऊस झाला, कुकाना परिसरातील जेऊर, चिलेखनवाडी, पाथरवाले, वडुले, गेवराई,अंतरवाली, नांदूर तरवडी, देवसडे, तेलकुडगाव आदी गावात गहू मका कांदा आदी पिके पावसाने झोडपली असल्याने शेतकरी संकटात सापडला त्यात अगोदर झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यात आणखी भर पडल्याने, शेतकरी अडचणीत सापडला आहे. -चिलेखनवाडी येथील सावंत वस्ती येथील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली त्यात झाडावर जळाचे लोळ बऱ्याच वेळापर्यंत होते.

चालू वर्षी सततचे बदलते हवामान पिकांवरील रोग राही, अवकाळी पाऊस, गारपीट या मुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्यात कापूस, कांदा या पिकाना भाव नसल्याने शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत सापडला आहे.

मागील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाले नाही तोच नवीन संकट शेतकऱ्यांपुढे उभा.
शेतकरी- भाऊसाहेब फोलाने कुकाणा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!