नेवासा तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा सह नेवासा तालुक्यामध्ये पावसाचे थैमान…
चीलेखनवाडी मध्ये झाडावरती वीज पडून झाड जळून खाक..........
नेवासा तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा सह नेवासा तालुक्यामध्ये पावसाचे थैमान……. सलाबतपुर शिवारात वीज पडून जनावरे दगावली…
तर चीलेखनवाडी मध्ये झाडावरती वीज पडून झाड जळून खाक……….
नेवासा प्रतिनिधी -(मंगेश निकम)
नेवासा तालुका मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी राजाच्या चिंतेत वाढ झाली असून आता हाता तोंडाशी आलेला घास परत जाणार की काय ही शेतकरी राजास चिंता लागून राहिली आहे.
आज नेवासा तालुक्यामध्ये वातावरणामध्ये अचानक बदल होऊन विजेच्या करकटासह जोरदार पावसाने हजेरी लावलेली असून विज पडल्यामुळे सलाबतपुर शिवारांमधील दिघी रोडला असलेले शेतकरी सोपान पडोळे यांच्या गोठ्यावरती वीज पडून एक म्हैस दगावली असून त्याचबरोबर घरातील इलेक्ट्रिक बोर्ड, फॅन, टीव्ही आदी उपकरणे जळून खाक झाली आहे.
तसेच चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत सर यांच्या शेतामध्ये नारळाच्या झाडावरती वीज पडून नारळाचे झाड जागीच खाक झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अदीक माहिती सलाबतपुर येथील शेतकरी सोपान पडोळे यांनी एस.नाईन मीडियाशि बोलताना दिली.
या अवकाळी पावसामुळे व विजेच्या भीतीमुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेमध्ये नेवासा तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे.
काही महिन्यापूर्वीच अवकाळी पावसाचा तडाखा नेवासा तालुक्याला बसला होता तो भरून निघत नाही तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
आत्ताच कुठेतरी मागे झालेल्या अवकाळी पावसा मधून शेतकरी राजा सावरत नाही तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकरी राजाला चिंतेत पाडण्याचे काम व भीतीचे काम निर्माण केले आहे.
या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू,कांदे आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचेही चित्र जाणवत आहे.
काही ठिकाणी तुरळक गारा तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून त्यामध्ये कांदा ,मका गहू , हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मागील नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसून त्यातच शेतकऱ्यावरती वारंवार अस्मानी संकट पडत आहे त्यामुळे शेतकरी राजा पूर्णतः कोल मोलडून पडल्याचे चित्र नेवासा तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे.
तरी आता या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसाना बद्दल शासन काय निर्णय घेतय हेही तितकेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे……