वडूलेत वादळी पावसाने झाडे उन्मळून पडली.. मोठया प्रमाणात नुकसान…
वडूलेत वादळी पावसाने झाडे उन्मळून पडली..
मोठया प्रमाणात नुकसान...
कुकाणा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील वडूले येथे शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेकांची घरे यात पडली काहीच्या घरावर झाडे पडल्याने मालमत्तेचे सुद्धा मोठे नुकसान झाले, तसेच काढणीला आलेला कांदा, गहू आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली वडूले येथील
मा सरपंच बाबासाहेब आतकरे, गंगाधर गर्जे, लक्ष्मण भारस्कर, दादासाहेब ऊभेदळ,पोपट ऊभेदळ, अशोकराव जर्हाड, बबनराव देशमुख, सुनिल पवार या शेतकऱ्यांच्या घरावर झाडे उन्मळून पडली,अंबादास बडे,आजीनाथ कल्हापुरे यांचे अनुक्रमे लिंबोणि, डाळींबाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले,ज्ञानदेव भागवत शिवाजी आतकरे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले विनायक सरोदे शहाराम सांगळे यांचेसह अनेक शेतकऱ्यांचे बाजरीचे खूप नुकसान झाले सरपंच दिनकरराव गर्जे यांनी प्रांत श्रीनिवास अर्जुन साहेब, तहसीलदार संजय बिरादार साहेब सर्कल फुलमाळि भाऊसाहेब कामगार तलाठी विरकर भाऊसाहेब ग्रामसेविका भाग्यश्री कदम कृषी सहाय्यक भागवत याना फोनवरुन त्वरित माहिती दिली प्रांत श्रीनिवास अर्जुन साहेबांच्या सुचनेनुसार लगेच कामगार तलाठी विरकर यांनी घटनास्थळी येऊन प्रत्येक्ष येऊन पहाणी केली व वरिष्ठांना नुकसान झालबाबत माहिती कळवली सरपंचदिनकर गर्जे
उपसरपंच,ज्ञानेश्वर देवढे, मा व्हा चेअरमन वल्लभराव गर्जे,अरुण आतकरे,शिवराम आरोटे,अशोक भाऊसाहेब गर्जे,काकासाहेब खाटिक,संतोष ढोकणे,अनेक शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करण्याची मागणी या वेळी केली