क्रिडा व मनोरंजन

चंद्रहास गवळी यांना भारुडरत्न पुरस्कार..

सर्वच क्षेत्रातील मान्यवंराकडून अभिनंदनचा वर्षाव..

चंद्रहास गवळी यांना भारुडरत्न पुरस्कार

कुकाणा प्रतिनिधी –

तरवडी, ता. नेवासा येथीलसोमेश्वर भारूड मंडळ लोक कलावंत चंद्रहास गवळी यांना सोहम पब्लिकेशन व पटकोळी साहित्यप्रेमी विचार मंच यांच्या वतीने राज्यस्तरीय भारुडरत्न पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत कॉ. बाबा आरगडे यांचे हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. औरंगाबाद – सिडको येथे सोहम

पब्लिकेशन व पटकोळी साहित्य प्रेमी विचारमंच यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा दि. २६ जून रोजी पार पडला. यावेळी व्यासपीठांवर मान्यवर उपस्थित होते.

कवी, लेखक व गीतकार बाबासाहेब मंडलिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. साहित्यिक
विजय काकडे, संतोष सावरे, कवी शहादेव सुरासे, मिठू आंधळे, रज्जाक शेख आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी पुरस्कारप्राप्त गवळी यांचे नेवासा तालुक्यातून सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले गेले, तसेच ठिकठिकाणी सत्कारमूर्ती गवळी यांचे सत्कारही सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!