कुकाण्यात २४ तास उलटूनही वीज बंदच.. नागरिक त्रस्त..
कुकाण्यात २४ तास उलटूनही वीज बंदच..
नागरिक त्रस्त..
कुकाणा प्रतिनिधी –
कुकाणा व परिसरातील आठ गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने विजेच्या तारा तुटल्याने तसेच खांब पडल्याने
गेली चोवीस तास कुकाना येथे वीज नसल्याने नागरिक संतापले आहे, अनेकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, तसेच गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असुन, गेली दोन दिवस कुकाणा गाव तसेच परिसर अंधारात आहे.
तांत्रिक अडचन असल्याचे वीज कर्मचारी तसेच अधिकारी सांगत असल्याने एक दिवस वीज येईल असे वाटत असताना मात्र २४तास उलटून ही वीज प्रवाह सुरळीत करण्यास अपयश आल्याने नागरिकांना याचा मोठा संताप झाला आहे, कुकाणा गाव मोठे व बाजार पेठेचे आहे वीज नसल्याने दुकानदार यांचे ही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
वीज सुरळीत न झाल्यास कुकाण्यात आंदोलन करण्याचा ईशारा ही सामाजिक कार्यकर्ते तसेचे कुकाना ग्रामस्थांनी दिला आहे.