
कुकाणा -(महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा)
नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचा प्रचार मेळावा भेंडा येथे उद्या बुधवारी (दि.२६) सकाळी ९ वाजता संत नागेबाबा भक्त निवास येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, देसाई आबा देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या प्रचार मेळाव्याला सर्व मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे, असे आवाहन सहकार पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.