ब्रेकिंग

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती शिवारात अंगावर वीज पडून सविता राजू बर्फे या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती शिवारात अंगावर वीज पडून सविता राजू बर्फे या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
तांबे वस्ती शिवरात कांदे काढण्यासाठी गेलेले असताना अचानक अवकाळी संकट आल्याने अचानक पाऊस वारा व विजेचा कडकडाट सुरू झाला तेवढ्यात कांदे काढणाऱ्या महिला पळापळी करू लागल्या तेवढ्यात अचानक सविता राजू बर्फे या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा आकस्मित जागीच मृत्यू झाला. महिलेचे वय 42 होते तर तिच्या मागे पती, मुलगा, मुलगी भाऊ , आई असा मोठा परीवार आहे.
यावेळी गावात खबर पसरताच गावातली लोकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेतली .यावेळी नेवासा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाना पोलीस नाईक तुकाराम खेडकर, पोलिस नाईक तांबे, बबलू चव्हाण यांनी स्पॉट पाहणी केली. व जागेवरील पंचनामा करून मृतदेह नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!