राजकिय

शेतक-यांच्या उत्कर्षासाठी कोपरगांव बाजार समितीच्या निवडणुकीत परिवर्तनाची बॅट तळपण्याची पुनरावृत्ती दुरवणार…

शेतक-यांच्या उत्कर्षासाठी कोपरगांव बाजार समितीच्या निवडणुकीत परिवर्तनाची बॅट तळपण्याची पुनरावृत्ती दुरवणार…

कोपरगाव – (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )अरुण आहेर 

भले आपले कितीही राजकारण असले तरी ते आपापल्या ठिकाणी पण शेतक-यांच्या संस्थेत त्यांच्या उन्नतीसाठी राजकीय जोडे बाजुला ठेवुन कार्यरत रहायचे हा कर्मवीर स्व. शंकरराव काळे व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा मुलमंत्र दुस-या पिढीतही कायम राहिला माजी आमदार अशोकराव काळे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगांव बाजार समितीची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सतत पुढाकार घेतला आणि हया निवडणुका आजवर बिनविरोध घडविल्या आहेत, चालु कोपरगांव तालुका कृषी बाजार समितीची पंचवार्षीक निवडणुकही बिनविरोध करण्यांसाठी तिसऱ्या पिढीतील आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी पुढाकार घेवुन निवडणुक बिनविरोध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
शेतक-यांबरोबरच सहकारी संस्था टिकल्या पाहिजे त्यातून सर्वांचा उत्कर्ष, विकास झाला पाहिजे ही भावना या तालुक्याचे नेते काळे व कोल्हे या कुटुंबियांची राहिलेली आहे त्यासाठी त्यांनी वेळोवेळी राजकीय जोडे बाजुला ठेवुन खंबीर भूमिका घेतली आहे.
गेल्या पाच वर्षापासुन कोरोना परिस्थितीमुळे आर्थीक परिस्थिती दोलायमान झालेली आहे, सर्वांसमोर काही ना काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याला प्रत्येकाने आपापल्या परिने तोंड दिलेले आहे. कोपरगांव बाजार समितीची निवडणुक नुकतीच जाहिर होवुन त्यासाठी सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
बाजार समिती ही शेतक-यांची संस्था असुन ती टिकली पाहिजे, त्यात कुठेही राजकारण येता कामा नये, त्यातुन शेतक-यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न व्हावेत याच उददेशांने आजवर सत्तारूढ संचालक मंडळाने पुढाकार घेवुन काम केले आहे.
कोपरगांव बाजार समितीत पहिले अडीच वर्षे कोल्हे गटाचा सभापती तर काळे गटाचे उपसभापती व नंतरच्या अडीच वर्षात काळे गटाचा सभापती तर कोल्हे गटाचे उपसभापती कारभार पाहणार आहेत. ही निवडणुक बिनविरोध घडविण्यांत सर्वच तोलामोलाचे उमेदवार साथ देत आहेत. औताडे व परजणे गटाच्या नेतृत्वांनेही त्यात सकारात्मकता दाखवली आहे
लोकशाही संवर्धन व सर्वसामान्य जनतेला प्रबळ आधार आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्व संस्था कामकाजात सुसूत्रता पारदर्शकता आणण्यासाठी जनप्रतिनिधी स्पीड ब्रेकर हवा. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधक हवे, निवडणूका अत्यावश्यक आहे
परंतु आज कोणत्याही जनसमस्या सोडविण्यासाठी कोणीही केवळ जनहितार्थ सर्वस्व पणाला लावीत नाही. वैयक्तिक द्वेष, मत्सर,स्वार्थ , भ्रष्टाचार चमकोगिरी या भस्मासुरी प्रवृत्तीने ह्या देशाच्या अब्रुची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगून देश रसातळाला पोहोचवित आहे.
एवढे घडत असतांना जनतेने लोकशाही केवळ जिवंतच ठेवण्यापेक्षा देश व देशातील सर्व संस्था मजबूत ठेवल्या आहेत
कोणत्याही परिस्थितीत आज महाराष्ट्रात हजारो संस्था मोडकळीस आलेल्या असताना कोपरगांवातील सहकारी संस्थांना मजबूत नेतृत्वाचा आधार मिळाला असल्याने त्या प्रगती पथावर आहे, हे जनतेला चांगलेच माहीत आहे. तरीही जनतेने तालुक्यात योग्य वेळी विरोधकांना पाठबळ दिले. परंतु स्व. सुर्यभान वहाडणे पाटील, प्रा.स्व ना.स.फरांदे , राजेंद्र झावरे तसेच काका कोयटे वगळता कोणीही आपला ठसा उमटवू शकले नाही. केवळ विरोधासाठी विरोध, चमकोपत्रकबाज असंतुष्ट आत्म्यांना जनता खड्यासारखे दूर फेकते याचमुळे कोपरगांव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतच नव्हे तर आगामी निवडणुकात परिवर्तन घडेल ही आशा फोल ठरते
हे जरी खरं असलं तरीही प्रत्येक निवडणुकीत परिवर्तनांची नांदी असते. जितके काळ सत्तारूढ कार्यरत असतात त्या पटीने त्यांच्याकडून क्रूर अंहकारातून आपल्या टाचेखाली जनता रहावी आणि फाजील आत्मविश्वासातुन अत्याचाराच्या अतिरेकाने अक्षम्य चुका कळत – नकळत घडतात त्यांना अनेक कारणांमुळे प्रखर नाराजी व विरोधांचे फटके बसतात या अन्यायाविरुद्ध जनतेचा पाठिंबा सहजपणे लाभतो. फाटके दुर्बल, खिजगणतीतही नसलेल्यांना जनता डोक्यावर घेते. परंतु कितीही अडथळे निर्माण झाले तरी प्रामाणिक जिद्दीने जो उभा रहातो तोच सिकंदर ठरतो. हा हजारो वर्षाचा जागतिक इतिहास आहे.
प्रत्येक पराभवात भावी यशाची गुरुकिल्ली असते. कोपरगावकरांना आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद- तालुका पंचायत समिती, विधानसभा – लोकसभा, आदी निवडणूकांना सामोरे जावे लागेल या परिस्थितीत विरोधकांनी आता खचून न जाता आपली प्रत्येक चुक, कमतरता, कृती यात दुरुस्ती करून संघटीतपणा कायम राखून प्रत्येक निवडणुकीत पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे उगवून जनतेला गृहीत न धरता आपल्या कायमस्वरूपी कार्यातून जनतेला विश्वासात घेतले तरच जनता डोक्यावर घेईल हे निश्चित!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!