किडस किंगडम विद्यालयात रोबोटिक्स लॅबचे उदघाटन

किडस किंगडम विद्यालयात रोबोटिक्स लॅबचे उदघाटन
सोनई(वार्ताहर) सोनई येथील किडस किंगडम विद्यालयात आज विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे अधिक ज्ञान व्हावे याकरीता तालुक्यात सर्वप्रथम रोबोटिक्स लॅब उपक्रम राबविण्यात आला. या विशेष योजनेचे उदघाटन तालुका गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव सचिन बंग यांनी केले. प्रास्ताविक भाषणात प्राचार्या किर्ती बंग यांनी
विद्यालयात सुरु असलेल्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. प्रोजेक्ट मॅनेजर किरण जाधव यांनी लॅब व तेथील शिक्षणाची माहिती दिली. कराड यांनी आपल्या भाषणात नेवासा तालुक्यात सर्वात अगोदर झालेल्या उपक्रमाचे कौतुक करुन विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल असे सांगितले.
जाधव व शिक्षीका स्वाती चौधरी यांनी उपस्थित पालकांना रोबोटिक्स मधील शिक्षण पध्दतीची माहिती देवून उपकरणांची ओळख करून दिली.अली कादरी,गौरी काबरा, विनायक दरंदले उपस्थित होते. इयत्ता पहिली ते दहावीतील चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून नवीन शैक्षणिक वर्षात अधिक प्रवेश होणार आहे. रोबोटिक्स शिक्षणाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात सहभाग घेवू शकतील असे किरण जाधव यांनी सांगितले. नानासाहेब हापसे यांनी सुत्रसंचालन केले.ढाले सर यांनी आभार मानले.
———————————