*माननीय जयंत पाटील मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार :-माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे सर*

माननीय जयंत पाटील मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार
अहमदनगर . माननीय जयंत पाटील भावी मुख्यमंत्री व्हावे यासाठी श्री कोल्हे यांनी उद्घोषित केलेले मत योग्य आहे कारण आमदार पाटील हे अभ्यासू आहेत शिवाय अर्थशास्त्राचा त्यांचा अर्थसंकल्प सादर केल्यामुळे अभ्यास चांगला झालेला आहे महाराष्ट्राची आर्थिक प्रगती व त्या अनुषंगाने ध्येय धोरणे तयार करण्यासाठीव अमलात आणण्यासाठी त्यांच्या समृद्ध अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा होईल त्यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अत्यंत चांगले सांभाळून संघटन कौशल्य सिद्ध केले आहे शिवाय सहकार तत्वांचा अभ्यास व त्यातून सहकारी साखर कारखानदारीचा विकास त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिला आहे त्यांचा शांत संयमी स्वभाव सर्वांना भावतो तसेच त्यांची सहनशीलता व त्याबरोबर सुसंस्कृतपणा आणि सुरजनशीलता यामुळे महाराष्ट्राचे नेतृत्वयशस्वीपणे माननीय नामदार जयंत पाटील साहेब करू शकतील यातील मात्र शंका नाही तरी त्यांना महाराष्ट्रातून सर्व थरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवावा अशी स्पष्ट प्रतिपादनअशोकराव ढगे यांनी केले आहे.