गुन्हेगारी

*रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी मोटरसायकल चोरांना पकडले भिंगार कॅम्प पोलिसाची दमदार कामगिरी…..*

*रात्रीच्या गस्तीवरील पोलसांनी मोटारसायकल चोराला पकडले*
*भिंगार कॅम्प पोलिसांची कामगिरी*
नगर – भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालणार्‍या पथकाने बुर्‍हाणनगर रोडवरील गोंधळेमळा फाट्यावर चोरीची मोटारसायकल घेऊन फिरणार्‍या मोटारसायकल चोराला भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने पकडले आहे.
याबाबत रोहन सुनील पाटोळे (रा.बहिरवाडी, ता.नगर) असे या मोटारसायकल चोराचे नाव आहे. भिंगार पोलिस ठाण्यातील पो.हे.कॉ. पांडुरंग बारगजे, एस. एन. काळे हे बुधवारी (दि.२६) पहाटे २.३० च्या सुमारास पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालताना बुर्‍हाणनगर रोडवर गोंधळे मळा फाटा येथे त्यांना गर्दी दिसली. त्यांनी तेथे थांबून गर्दीतील भरत कर्डिले नावाच्या व्यक्तीला काय झाले म्हणून विचारणा केली. त्यावेळी त्याने आमचा मित्र विकी जाधव याचा गजराजनगर जवळ अपघात झाल्याचे कळाल्याने आम्ही येथे थांबलो असल्याचे सांगितले.
यावेळी त्या जमावातील एक तरुणाकडे विनाक्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल दिसली. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अगोदर आपले नाव रोहन सुनील गोर्डे असे असल्याचे खोटे सांगितले. त्याला अधिक विश्‍वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने रोहन सुनील पाटोळे असे खरे नाव सांगून सदरची मोटारसायकल पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील यात्रेतून १५ दिवसापुर्वी चोरल्याची कबुली दिली. त्याला पोलिसांनी अटक करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १२४ सह भा.दं.वि.क. १७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अजय नगरे करत आहेत . सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस निरीक्षक प्रशांत खैरे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दिनकर मुंढे ,उपनिरीक्षक निसार शेख, बी. एस. दिवटे, अजय नगरे, पांडुरंग बारगजे, अमोल आव्हाड, एस. एन. काळे, रेवणनाथ दहिफळे आदींच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!