नेवासा तालुका निसर्गाच्या थाईमानाने पुन्हा एकदा हादरला म्हसले गाव येथील दहा वर्षीय साई राजेंद्र शिरसाट या बालकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू

नेवासा तालुका निसर्गाच्या थाईमानाने पुन्हा एकदा हादरला म्हसले गाव येथील दहा वर्षीय साई राजेंद्र शिरसाट या बालकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू आई सोबत गेला होता शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी पावसापासून कांदे वाचवण्याच्या धडपडीत ईवल्याच्या बालकांनी गमावला जीव हृदय पुरवून टाकणारी घटना…….
नेवासा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील म्हसले येथील रहिवासी साई राजेंद्र शिरसाठ या दहा वर्षीय बालकाचा दुपारी 12 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकटासह पाऊस सुरू असताना आपल्या आई सोबत कांदे झाकण्यासाठी साई हा शेतामध्ये गेले असता त्याच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील मसले या गावी नुकतीच घडलेली आहे. कालच नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे एका महिलेच्या अंगावरती काम करत असताना वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली ती घटना निवाळत नाही तोच आता नेवासा तालुक्यामधील म्हसले या गावी एका दहा वर्षीय निरागस बालकाचा वीज पडून मृत्यू झाल्याने तालुक्यात मोठे मोठी खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या निसर्गाच्या कोपामुळे शेतीचे नुकसान तर होतच आहे परंतु शेतकरीही मृत्युमुखी पडतानीच्या घटना घडताना पहावयास मिळत आहे .अशा घटनांमुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र नेवासा तालुक्यामध्ये दिसत आहे तरीही एस नाईन न्यूज चैनल सर्व शेतकरी मित्रांना आव्हान करतो की पाऊस सुरू असताना कोणत्याही प्रकारे घराच्या बाहेर पडू नका आपल्या लहान बालकांना संभाळा हे जीवन एकदाच आहे. तरीही म्हसले येथील साई राजेंद्र शिरसाट या मुलाच्या घरी प्रशासन लवकरात लवकर भेट देऊन योग्य ती मदतीचा आधार द्यावा हीच एक अपेक्षा परिसरामधून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भामध्ये नेवासा पोलीस स्टेशन येथे हरिभाऊ कचरू शिरसाठ यांनी फिर्याद दिली असून तसेच साई राजेंद्र शिरसाठ यांना शव विच्छेदनासाठी नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते तदनंतर आपल्या मूळ गावी म्हसले येथे त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेमुळे तालुक्यामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.