केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी अशोकराव भानुदास तांबे सर यांची निवड………

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाअध्यक्षपदी अशोकराव भानुदास तांबे सर यांची निवड. यासंदर्भात माहिती अधिक आशिकी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सलाबतपुर येथील रहिवासी अशोकराव तांबे सर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांना केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजीव दळवी तसेच श्री गोविंद गोरे राष्ट्रीय सचिव यांच्या पत्राच्या सही द्वारे नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर पाहता अशोकराव तांबे सर यांचे सामाजिक कार्य तसेच जनहितार्थ कार्य व समाजासाठी अविरहित पणे लढा देणारे नेतृत्व म्हणून अशोकराव तांबे सर यांना नेवासा तालुक्यात नव्हे तर जिल्हाभर बघितला जाते . अशोकराव तांबे सर हे मूळ सलाबतपुर येथील रहिवासी असून त्यांनी या मागे आपल्या सामाजिक कार्यामधून अनेक प्रश्न विषयी उपोषण आंदोलन तसेच अनेक अन्यायग्रस्त सामाजिक लोकांच्या भूमिका सरकार पुढे मांडले आहेत व त्यांचा लढा आजही अविरतपणे चालूच आहे त्याच अनुषंगाने त्यांचे सामाजिक कार्य बघून केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाने त्यांना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे तरीही अशोकराव तांबे सर बोलताना म्हणाले की भविष्यकाळातही मी सामाजिक कार्य अविरतपणे चालू ठेवणार आहे व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाने दिलेल्या संधीचे सोने करणार आहे व सामाजिक कार्यामध्ये आपला अविरहितपणे ठसा उमटवण्याचे काम व जी काही माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे विश्वास दर्शक ठरवेल असे आपली भावना अशोकराव तांबे सर यांनी बोलताना व्यक्त केली.