आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नेवासा तालुक्यातील फिरते वाचनालय ही पुरोगामी चळवळ व अजरामर कृती आहे :-कॉ बाबा आरगडे

नेवासा तालुक्यातील फिरते वाचनालय ही पुरोगामी चळवळ व अजरामर कृती आहे.:-कॉ बाबा आरगडे

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील सौंदळा या गावी**फिरते मोफत वाचनालय व पुस्तक आपल्या भेटीला**हा उपक्रम शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा नेवासा यांच्या वतीने उत्साहात पार पडला याप्रसंगी कॉम्रेड बाबा आरगडे यांनी फिरते मोफत वाचनालय ही पुरोगामी चळवळ व त्याचबरोबर अजरामर कृती आहे असे गौरव उद्गार काढले या उपक्रमाला अनुदान नाही सरकारची मदत नाही परंतु कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे प्राचार्य डॉक्टर धनवटे व पांडुरंग रोडगे तसेच दिगंबर गोंधळी हा उपक्रम पदर खर्चाने मोठ्या प्रमाणात राबवीत आहेत व त्यासाठी जनतेमधून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल कॉम्रेड आरगडे यांनी समाधान व्यक्त केले वाचनातून इतिहास स्पष्ट होतो मुकुंदराव पाटील दिनमित्रकार यांची पुस्तके वाचल्यास वैचारिक जडणघडण व क्रांतिकारक विचार समाजामध्ये लोकोपयोगी ठरतात असे प्रतिपादन त्यांनी केले
याप्रसंगी गणेश आरगडे प्रकाश बोधक अमोल आरगडे नंदू अडागळे किशोर आरगडे बाबासाहेब बोधक प्रसाद पाटोळे अशोक आरगडे ज्ञानेश्वर थोरात बाळासाहेब बोधक व सरपंच शरद आरगडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते
कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी प्रास्ताविकात वाचन संस्कृती बद्दल मौलिक विचार मांडले भविष्यात विचारांची पेरणी फिरते मोफत वाचनालयातून होत असल्याचे त्यांनी सांगितले संबळ वाजून पोवाडा सादर करून दिगंबर गोंधळी यांनी जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम कौतुकास्पद असल्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!