मा खा यशवंतराव गडाखांच्या कार्यप्रवासाच्या थ्रीडी मॉडेलचे सोनईत लोकार्पण.
80 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उदयन गडाखांच्या संकल्पनेतून साकारला उपक्रम...

मा खा यशवंतराव गडाखांच्या कार्यप्रवासाच्या थ्रीडी मॉडेलचे सोनईत लोकार्पण.
80 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला
उदयन गडाखांच्या संकल्पनेतून साकारला उपक्रम.
नेवासा प्रतिनिधी – (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
सहकार,राजकारण, साहित्य,समाजकारण यामध्ये चौफेर कामगिरी करणारे मा खा यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला गुरू दि 11 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता
मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या प्रवेशद्वारावर मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून मा खा यशवंतराव गडाख यांनी स्थापन केलेल्या मुळा सहकारी साखर कारखाना सोनई,मुळा एज्युकेशन सोसायटी,अर्धविराम,अंतर्वेध,माझे संचित, सहवास या सहित्य संपदेच्या प्रतिकृतीसह,सोनई गावची परंपरा सांगणारी कमान,वृक्षारोपन चळवळ आदीं कामकाजाचा थ्रीडी चित्ररूपी मागोवा घेणाऱ्या प्रतिकृतीचे लोकार्पण जेष्ठ नेते विश्वासराव गडाख,साहित्यिक अरुण शेवते,द वि अत्रे,डॉ सुभाष देवढे पाटील,मुळा एज्युकेशन सोसा उपाध्यक्ष उदयन गडाख आदींच्या हस्ते संपन्न झाले.
तसेच याप्रसंगी वाढदिवसाच्या निमित्ताने वटवृक्षाचे वृक्षारोपन करण्यात आले.
सोनई येथील मारुती मंदिर जेष्ठ नागरिक मित्रमंडळास ‘भावविश्व’या पुस्तकांची भेट अरुण शेवते व द वि अत्रे यांच्या हस्ते देण्यात आली.
उपस्थित मान्यवरांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत उदयन गडाख यांनी केले.
तरुण पिढीला मा खा यशवंतराव गडाख यांच्या कामातून प्रेरणा मिळावी नाविन्यपूर्ण व निर्मितीचे मा खा यशवंतराव गडाख यांना अभिप्रेत असलेले काम तरूण पिढीकडून घडावे या हेतूने वाढदिवसाच्या निमित्त थ्री डी प्रतिकृती उभी करून
मा खा यशवंतराव गडाख यांचे विचार तरुण पिढी पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे उदयन गडाख म्हणाले
तसेच 80 व्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यातील गावा, गावात पावसाळ्यात वटवृक्षाचे वृक्षारोपन करून गावे सदाहरित करण्याचा मा खा यशवंतराव गडाख यांचा वसा जपणार आहोत असे उदयन गडाख म्हणाले.
याप्रसंगी कु समृद्धी राजेंद्र रौंदळ
,कु साबिया सय्यद, अभिषेक बारहाते,नानासाहेब रेपाळे, द वि अत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले.
मा खा यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनप्रवासावर आधारित उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून थ्री डी प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले ही मा खा यशवंतराव गडाख यांना वाढदिवसाची खरी भेट आहे यामुळें हजारो विद्यार्थी व तरुणांना मोठी ऊर्जा भेटणार आहे व त्यातून त्यांचे भविष्य घडण्यास मदत होणार आहे
तसेच वृक्षारोपन व पुस्तक भेट उपक्रमाचेही अरुण शेवते यांनी स्वागत केले.
जेष्ठ नेते विश्वासराव गडाख यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी
द वि अत्रे,सोनई चे सरपंच धनंजय वाघ, मदनराव डोळे, चेअरमन, नानासाहेब तुवर ,उदय पालवे,एकनाथ गडाख,आप्पासाहेब निमसे ,हरिभाऊ दरंदले,आप्पासाहेब शेटे,शिवाजी बाफना,बाळासाहेब सोनवणे,रणजित जाधव, विनायक दरंदले,सचिव उत्तमराव लोंढे,सहसचिव डॉ विनायक देशमुख,आप्पासाहेब शेटे,महादेव दराडे,ललित चंगेडिया,महावीर चोपडा आदींसह विद्यार्थी ,विद्यार्थीनी,जेष्ठ नागरिक मारुती मित्रमंडळ सदस्य सोनई व परिसरातील तरुण ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
………………………………………………………………..
मा खा यशवंतराव गडाख यांच्या 80 वर्षाच्या जीवन प्रवासावर आधारित थ्री डी प्रतिकृती विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे
तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील गावा गावात वटवृक्षाचे वृक्षारोपन करून
निसर्ग संवर्धन केले जाणार आहे
उदयन गडाख.
उपाध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई,
उपाध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई.