सोनईत महिला पारायण सप्ताहाचे आयोजन आमदार गडाखांच्या हस्ते ध्वजारोहण

सोनईत महिला पारायण सप्ताहाचे आयोजन
आमदार गडाखांच्या हस्ते ध्वजारोहण
सोनई –
आनंदवन सेवाभावी संस्थेच्या प्रथम वर्धापनदिन निमित्त महिला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे ध्वजारोहण आमदार शंकरराव गडाख यांचे हस्ते व आध्यात्मिक मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.१२ मे २०२३ रोजी होणार आहे. पारायण सप्ताहाला सामाजिक व पर्यावरण उपक्रमाची जोड देण्यात आली आहे.
पारायण सप्ताहात सकाळी आरती सोहळा,सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरीपाठ व रात्री भजनसंध्या होणार आहे. आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन उदघाटन होणार आहे. दिपाली व अशोक हारदे यांच्या हस्ते ध्यानमंदीर समोर बसविण्यात आलेल्या तुलसी वृंदावन व ध्वज स्तंभाचे पूजन होणार आहे. कार्यक्रमास
पंढरीनाथ महाराज तांदळे, कारभारी महाराज झरेकर, ओमशांती केंद्राच्या उषादिदी, अदिनाथ महाराज दुशिंग, साध्वी तुलसीदेवी,विठ्ठल खाडे महाराज,भानुदास महाराज शिरसाठ,सोमनाथ महाराज गडाख, निवृत्ती महाराज लांडे,शिवप्रसाद महाराज पंडित, रामेश्वर महाराज राऊत,रायभान महाराज बेल्हेकर उपस्थित राहणार आहेत. शनिवार दि.२० रोजी सकाळी नऊ वाजता महंत उध्दव महाराज मंडलिक यांचे काल्याचे किर्तन,पसायदान पुरस्कार वितरण व महाप्रसाद वाटप होणार आहे.ग्रामस्थ व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उदय पालवे, संजय गर्जे व सदस्य मंडळाने केले आहे.
——————————