राजकिय

शेतकऱ्यांना सरसकट मदत करा अन्यथा तालुका रस्त्यावर उतरेल – आमदार गडाख

शेतकऱ्यांना सरसकट मदत करा अन्यथा तालुका रस्त्यावर उतरेल
– आमदार गडाख

नेवासा प्रतिनिधी -(महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

नेवासा तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे पंचनामे करून सरसकट मदत केली जाईल असे आश्वासन दिले जात आहे जी काही मदत दिली जाते ती तुटपुंजी आहे हे योग्य नाही .नेवासा तालुका शांत आहे तोपर्यंत शांत आहे असा अन्याय झाल्यास तालुका पेटून उठेल व जनता तहसीलदारांना सळो कि पळो करून सोडेल असे आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा येथे जाहीर बोलतांना सांगितले .
नेवासा येथील ज्ञानदिप प्रांगणात बाजार समितीचे व खरेदी विक्री संघाच्या नूतन संचालक यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाला . अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते .
यावेळी गणेश भोरे , प्रभाकर कोलते , काका गायके , देसाई आबा , यांनी आपले मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन रेवनाथ पवार यांनी केले .
यावेळी बोलतांना आमदार गडाख म्हणाले कि नेवासा बाजार समितीच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य आपल्याला मिळाले फक्त 22 टक्के मते आपल्या विरोधात गेले .मतदारांनी आपल्यावर मोठा विश्वास दाखविला आहे .जास्त वेगाने प्रगतीपथावर जाणारी आपली संस्था आहे . परंतु विरोधकानीं आपल्या संस्थेच्या चौकशा लावल्या आहे .ज्यांना आपल्या संघटनेने अध्यक्ष केले , बाजार समितीचे अध्यक्ष केले तेच लोक आपल्या विरोधात दंड थोपटत आहे . विरोधकात लढण्याची क्षमता नसल्याने त्यांना बाहेरच्या लोकांची मदत घ्यावी लागत आहे . मेळावे , प्रचार फेऱ्या असे करण्याऐवजी मी थेट मतदार व शेतक ऱ्यांच्या व्यथा ऐकल्या . पिंपरी शहाली , चिंचबन व आणखी काही गावात सर्वांचे एकमत करून उमेदवार दिले दोन्ही गटाला एकत्र बसविले .गटा तटाचे राजकारण करू नये , एकजूट ठेवावी , गावातले मतभेद व रस्सीखेच कमी करा .आपली सर्वांची ताकद यातच खर्च होते एकोप्याचे वातावरण राहिले तर विकासाचा वेग वाढेल असे त्यांना आहवांन केले व त्या गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला त्याचप्रकरे तालुक्यातील अन्य गावांनी गटा तटाचे राजकारण करू नये असे आमदार गडाख म्हणाले .
माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी नेवासा बाजार समितीचा इतिहास सांगितलं व आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी हि संस्था कशी काम करते हे सांगितले.
आभार नंदकुमार पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!