नेवासा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर.आ शंकरराव गडाख.

नेवासा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर.आ शंकरराव गडाख.
नेवासा प्रतिनिधी – (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
नेवासा शहरात आ शंकरराव गडाख यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन
ह भ प शिवाजी महाराज देशमुख,ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर ,महंत सुनीलगिरीजी महाराज ,मा आ चंद्रशेखर घुले यांच्या शुभहस्ते व आ शंकरराव गडाख,मा आ पांडुरंग अभंग उपस्थितीत संपन्न झाले.या प्रसंगी नेवासा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी बोलतांना आ गडाख म्हणाले चहाच्या टपरीवर,स्टॅण्डवर,प्रसंगी झाडा खाली बसून मी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असतो
परंतु नेवासा येथे तालुका भरातून येणारे सर्वसामान्य नागरिक यांचे ‘डोल,शिधापत्रिका,एम ई सीबी,घरकुल,उत्पन्नाचे दाखले यासह तहसील,कृषी,नगरपंचायत,
पाटबंधारे,पंचायत समिती समिती
यांचेशी निगडित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी यंत्रणेसह सुसज्ज कार्यालय आपण सुरू केले आहे व ते सदैव जनसेवेसाठी सुरू राहील तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व कामाच्या बाबतीत काही अडचण आल्यास थेट संपर्क करावा असे गडाख म्हणाले
संपर्क कार्यालयाची जागा नेवासा खरेदी विक्री संघाकडून बीओटी तत्वावर सर्व बाबीची पूर्तता करून घेतल्याचेही यावेळी गडाख यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी महंत शिवाजी महाराज देशमुख, महंत उद्धव महाराज मंडलिक,सुनीलगिरी महाराज ,मा आ चंद्रशेखर घुले,मा आ पांडुरंग अभंग यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
————————————————————————–
गडाखांच्या संपर्क कार्यालयातुन जनतेच्या प्रश्नांची थेट सोडवणूक होणार असल्याने नागरिकांच्या वेळेची व इतर अनावश्यक खर्चाची बचत होणार आहे.
अनेकांना संकट काळात संपर्क कार्यालयाचा आधार मिळणार आहे.