राजकिय

वाळू डेपो विरोधात आ गडाख ग्रामस्थांसह मैदानात. उपोषणकर्त्यांना आ गडाख यांचा पाठिंबा

वाळू डेपो विरोधात आ गडाख ग्रामस्थांसह मैदानात.
उपोषणकर्त्यांना आ गडाख यांचा पाठिंबा..

पानेगांव प्रतिनिधी –  (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

नेवासा तालुक्यातील मुळाथडी परीसरातील अंमळनेर येथे मुळा नदीतून वाळू उत्खनन करुन वाळू डेपो निंभारी येथे करण्याचा जो शासनाने घाट घातला असून त्याचा ग्रामस्थांसह विरोध करणार असल्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा दिला .
वाळू उत्खनन तसेच डेपो त्वरित रद्द करावा यासाठी मुळाकाठच्या गावांनी शासनाच्या विरोधात उपोषण अंमळनेर करजगांव रस्त्यावरील लक्ष्मी काॅर्नर येथे सुरू केले असून आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असून माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील यांनी उपोषणास्थळी भेट देवून उपोषणकर्त्यांना लोकप्रतिनीधी या नात्याने पाठिंबा देवून तुमच्या मागं ठाम उभा असून मुळा नदीपात्रातील एकही खडा उचलू देणार नसून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला तर अख्खा तालुका आंदोलनकर्त्यांचा मागं उभा करेल असं आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.
मुळाकाठच्या ह्या गावतील अंमळनेर निंभारी, खुपटी, तिळापूर, इमामपूर,गोणेगाव, वांजूळपोई करजगांव ,वाटापूर ,पानेगांव ,मांजरी खेडलेपरमानंद ,शिरेगांव, वाटापूर पाचेगांव, आदी गावातील सरपंच,उपसरपंच, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक,शेतमजूर सामाजिक कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषणकर्ते संपत किशन पवार वय – ७६
तब्येत खालावल्याने अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
आजच्या तिसऱ्या दिवशी परीसरातील गांव बंद आंदोलन तसेच रास्तारोको करण्यात आला.
चौथ्या दिवशी महिला रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होवून आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रवरेचा तिरी असणारं पाचेगांव येथे आंदोलनला पाठिंबा म्हणून निषेध सभा घेवून गांव बंद ठेवण्यात आले. आम आदमी पार्टी ,नेवासा स्वाभिमानी शेतकरी संघटना अहमदनगर जिल्हा, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जनशक्तीच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

 

………………………………………………………………….
अंमळनेर येथे
वाळू डेपोसाठी वाळू उत्खनन झाल्यास अंमळनेर, पानेगाव,निंभारी,वाटापुर,इमामपूर,
गोणेगाव,शिरेगाव व परिसरातील पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते व शेती उध्वस्त होऊ शकते.
शासनाला नेवासा तालुक्यात वाळू डेपो करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे आहे का
असा संतप्त सवाल आंदोलक शेतकरी व ग्रामस्थ करत आहे.

…….,…………………………………………………….

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!