महाराष्ट्र

आमदार गडाखांच्या हस्ते सोनईत महिला पारायण सप्ताहाची सुरुवात

आमदार गडाखांच्या हस्ते सोनईत महिला पारायण सप्ताहाची सुरुवात

सोनई(वार्ताहर) सोनई येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या प्रथम वर्धापनदिन निमित्त आयोजित महिला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे उदघाटन आमदार शंकरराव गडाख व कारभारी महाराज झरेकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. येथील ध्यानमंदीर समोरील तुलसी वृंदावन पूजन व पंचवटी प्रदक्षिणा उपक्रमाची मोठ्या भावभक्तीत सुरुवात झाली.

आमदार गडाख व झरेकर महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंढरीनाथ महाराज तांदळे,अदिनाथ महाराज दुशिंग,
साध्वी तुलसीदेवी महाराज,
शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,माजी अध्यक्ष शिवाजीराव दरंदले,लक्ष्मणराव बडे,शिवाजी बाफना, सोनईचे उपसरपंच प्रसाद हरकाळे, डाॅ.रामनाथ बडे, द्वारका कुमावत,
पुनम लकडे,डाॅ.रजनी शिरसाठ,
मारुती मंडळाचे जेष्ठ सदस्य उपस्थित होते. संस्थेचे उदय पालवे,किशोर घावटे,दिपाली हारदे व गोविंद महाराज निमसे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.

प्रास्ताविक भाषणात संजय गर्जे यांनी येथे नव्याने अकार घेत असलेल्या ध्यानमंदीराची माहिती देवून संस्थेने राबविलेल्या सामाजिक,शैक्षणिक व धार्मिक उपक्रमाची माहिती दिली. झरेकर महाराज यांनी आशीर्वादपर भाषणात संस्थेचे कौतुक केले. आमदार गडाख यांनी येथील ध्यानमंदीर व आनंदवनच्या धार्मिक कार्यक्रमाने परीसराचा नावलौकिक झाल्याचे सांगून येथील चांगल्या कामाला निश्चित मदतीचा हातभार लावला जाईल असे सांगितले. दिपाली व अशोक हारदे यांनी दिलेल्या तुलसी वृंदावनचे पूजन झाले.गणेश हापसे यांनी सुत्रसंचालन केले. विनायक दरंदले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंदवनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.सोनई- पसायदान आनंदवन संस्थेच्या महिला पारायण सप्ताहाचे उदघाटन आमदार शंकरराव गडाख,झरेकर महाराज व मान्यवरांच्या हस्ते झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!