* गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायण व गावठी हातभट्टी विक्री करणा-यावर भिंगार कँप पोलीसांनी केली कारवाई*

मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला साहेबांच्या आदेशाने दिनांक 14/05/2023 रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत कापुरवाडी शिवार तसेच ब्रम्हतळे, कापुरवाडी शिवार येथे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी श्री. दिनकर मुंडे,पोसई/एम के बेंडकोळी, पोहेकाँ/760 अजय नारायण नगरे, पोहेकाँ/46 आर. के. दहीफळे, पोहेकाँ/378 आर.एस. मिसाळ, पोना/308 जी. एस. साठे, पोना/2178 आर. आर. द्वारके, पोना / 1724 डी.पी. शिंदे अशांनी मिळून दोन पंचासमक्ष छापे टाकून कापुरवाडी शिवार येथील भाऊसाहेब मुरलीधर पवार वय 62 वर्षे रा. कापुरवाडी ता. जि. अहमदनगर यांचे राहते घराचे आडोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे आंबट उग्र वासाचे कच्चे रसायन तसेच संतोष गोवर्धन पवार वय 36 वर्षे रा. ब्रम्हतळे,कापुरवाडी शिवार, ता. जि. अहमदनगर याचे राहते घराचे आडोशाला छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे आंबट उग्र वासाचे कच्चे रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ठ केली आहे . सदर कारवाई दरम्यान एकूण 71,000/- रू किं चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला आहे. सदर बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, यांचे मार्गदर्शना खाली उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे सो, श्री. दिनकर मुंडे, पोसई/एम के बेंडकोळी, पोहेकाँ/760 अजय नारायण नगरे, पोहेकाँ /46 आर के दहीफळे, पोहेकाँ/378 आर.एस.मिसाळ, पोना/308 जी एस साठे, पोना / 2178 आर आर द्वारके, पोना / 1724 दिलीप प्रकाश शिंदे यांनी सदरची कारवाई केली आहे.