गणेशवाडीत योगेश्वरी महाराज दरंदलेंच्या किर्तनाने भाविक मंत्रमुग्ध

गणेशवाडीत योगेश्वरी महाराज दरंदलेंच्या किर्तनाने भाविक मंत्रमुग्ध
सोनई(वार्ताहर) कौठा ता.नेवासा येथील युवा किर्तनकार योगेश्वरी महाराज दरंदले यांनी गणेशवाडी येथील सतोबा आखाडा येथील पारायण सप्ताहात अध्यात्म व सेवाकार्याचे निरुपण करताना कौटुंबिक व्यवस्था, मोबाईलचा अतीवापर, बालसंस्कार व व्यसनाची सुटका व्हावी म्हणून केलेल्या प्रबोधनाने उपस्थित भाविक व ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले.
महंत माधवबाबा लांडेवाडीकर यांचे पुण्यस्मरण तेवीस वर्षापासून येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन होत आहे.आजच्या किर्तनास लांडेवाडी येथील निवृत्ती महाराज लांडे,गणेश महाराज थिटे,अदिनाथ महाराज भोगे,सरपंच कैलास दरंदले, सागर दरंदले,विनायक दरंदले, शशिकांत शिंदे, बाबासाहेब झिने, एकनाथ दरंदले,भाऊसाहेब दरंदले,दत्तात्रेय लांडे,सिताराम शेटे उपस्थित होते.विविध सेवा व पंगत देणा-या दानशुर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. मंगळवार दि.१६ मे२०२३ रोजी सकाळी नऊ वाजता दौंड येथील हरीभाऊ महाराज को-हाळे यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटप करुन सोहळ्याची सांगता होणार आहे.
योगेश्वरी महाराज यांनी नामस्मरणाने आत्मिक समाधान तर मिळतेच शिवाय कौटुंबिक मनाला स्वास्थ्य मिळत असल्याचे सांगून ग्रंथाचे महत्व फक्त पारायण काळापुरतेच ठेवू नये असा मौलिक सल्ला दिला. सतोबा आखाडा येथील युवक व सर्व जेष्ठ ग्रामस्थांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करण्यात आले.सुत्रसंचालन एम एम दरंदले यांनी केले तर ज्ञानदेव पटारे यांनी आभार मानले.यमाजी दरंदले परीवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.
किर्तनास परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————-