आरोग्य व शिक्षण

सोनई परीसरात जागतिक योगदिन उत्साहात संपन्न…

सोनई परीसरात जागतिक योगदिन उत्साहात संपन्न...

सोनई –     (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

सोनई व परीसरात  योगदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळा,महाविद्यालय,सामाजिक संस्था,शासकीय व सहकारी संस्थेच्या वतीने योग,प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सोनईत पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्था,आर्ट ऑफ लिव्हिंग व अदिती वेलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने ध्यानमंदीर मध्ये झालेल्या शिबीरात संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमेचे पूजन करुन योगदिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी उपक्रमाची माहिती दिली. योग शिक्षक अॅड सुनिल गडाख व पुनम लकडे यांनी उपस्थितांना योग प्राणायामाचे धडे देवून मार्गदर्शन केले. संत निरंकारी भवन मध्ये विठ्ठल महाराज खाडे यांच्या उपस्थितीत योगदिन झाला.

प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयात उषादिदी यांनी मन आणि शरीर यांची एकाच वेळी तयारी झाली की रोज योग,प्राणायाम घडून येतो. यात सातत्य असेल तर ती व्यायामाची साधना होवून जीवनात राजयोग घडतो असे सांगितले. किडस किंगडम विद्यालयात प्राचार्या किर्ती बंग, आनंदवनचे विनायक दरंदले यांच्या उपस्थितीत तर स्मार्ट किडस विद्यालयात योग शिक्षिका मंजुषा गडाख,संस्था अध्यक्ष परेश लोढा,प्राचार्या सोनल लोढा यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा झाला.मुळा एज्युकेशन संस्थेचे विद्यालय,
महाविद्यालय व जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम संपन्न झाला.

———————————-

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!