सोनईतील किड्स किंग्डमचा दहावीचा १०० टक्के निकाल

सोनईतील किड्स किंग्डमचा दहावीचा १०० टक्के निकाल
सोनई(वार्ताहर) विविध सामाजिक उपक्रम व शैक्षणिक गुणवत्ता मध्ये अग्रेसर असलेल्या सोनई येथील किड्स किंग्डम विद्यालयाचा ‘सीबीएससी’ दहावीच्या बोर्ड परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विद्यालयातील जानवी विवेक चांडक(९७.४) गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम आली आहे. विद्यालयातील ओम गणपत राशिनकर (९६.८) द्वितीय तर आयुषी अतुल पटवा(९६.२)गुण मिळवून तृतीय आली आहे. सिध्दी बाबासाहेब कल्हापुरे (९५.८), तृप्ती सोपान लोणारे (९५.८)शिवम काशिनाथ पटारे (९२.२) व अदित्य बाबासाहेब मोटे(९०.६) गुण मिळवून प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य किर्ती बंग, संस्थेचे सचिव सचिन बंग,वर्गशिक्षक प्रविण ढाले, हनुमंत फटाले,उज्वला तांबे,
नानासाहेब हापसे,घनश्याम राजदेव व खुशबू लोढा यांचे
मार्गदर्शन लाभले.उत्कृष्ट अध्यापक वर्ग,अभ्यास पूरक वातावरण, सर्व शैक्षणिक सुविधांमुळे शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे परीसरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
———————————–