वन टाइम सेटलमेंट जिल्हा बँकेने अमलात आणावे- शेतकरी संघटना

नेवासा –
माननीय विधीतज्ञ अजित काळे साहेब महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना उपाध्यक्ष यांच्या शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे ,नेवासा संपर्क कार्यालयात नेवासा शेतकरी संघटनेची संपर्क नरेंद्र पाटील काळे शेतकरी संघटनेचे माध्यमातून शेतकरी सेटलमेंट या योजनेखाली जिल्हा सहकारी बँक कडे राष्ट्रीयकृत बँकेत वन टाइम सेटलमेंट स्कीम राबवली जाते त्याच धर्तीवर जिल्हा सहकारी बँक अहमदनगर हा नियम लागू करावा यासाठी नेवासा तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी चे ठराव तालुक्यातील चेअरमन व सचिव यांनी दिलेल्या रावाची कॉपी माननीय अजित काळेसाहेब यांच्याकडे सपोर्ट करताना कायदेशीर बाबी तपासून न्यायालयीन लढाईसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून शेतकरी संघटनेने आम्ही त्यांच्याजवळ सुपूर्द केले. लवकरच त्यावर विचार करून जिल्हा सहकारी बँक चेअरमन तसेच सहकार मंत्री सावे साहेब महाराष्ट्र नाबार्ड व राज्य सरकार यांच्याशी संपर्क करणार आहोत असे अजित काळे साहेब यांनी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना अहमदनगर अनिलराव आवताडे तसेच नेवासा तालुका अध्यक्ष त्रिंबक भजगले उपस्थित होते सततच्या अवकाळी पावसाने निसर्गाच्या लहरीने शेतकरी कर्जबाजारी होऊन कर्ज भरण्यास कुवत नसून त्याला या योजनेचा फायदा झाल्यास तो पुन्हा नवीन जोमाने शेती धोरण राबवू शकतो तसेच आत्महत्येचे प्रमाण कमी होऊन शेतकऱ्याचे भवितव्य उज्वल होऊ शकते. लवकरच शेतकरी संघटनेचे मंडळ सहकार खात्याकडे भेट देणारा असून कायदेशीर लढणार कायदेशीर लढाई लढणार असल्याचे माननीय अजित काळे साहेब यांनी सांगितले यावेळी भगवानराव आगळे अशोक नागवडे भाऊसाहेब शिवाजी काळे देवीदास गोरे जावळे पाटील ज्ञानेश्वर ढोले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते