सौंदाळा ग्रामपंचायत कडुन कन्यादान योजनेचा ५००० रु धनादेश वितरण

सौंदाळा ग्रामपंचायत कडुन कन्यादान योजनेचा ५००० रु धनादेश वितरण
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने १८ वर्ष पूर्ण असलेल्या गावातील मुलींच्या लग्नात संसार उपयोगी साहित्य खरेदी करिता ग्रामपंचायत मार्फत ‘लेक लाडकी सौंदाळा गावची’ या नावाने कन्यादान योजना सुरु करून पाच हजार रुपयाचा धनादेश देण्याचे ठरवले होते, त्यानुसार आज सौंदाळा गावातील कन्या अपर्णा बापुसाहेब अरगडे हिच्या विवाह प्रसंगी तिला पाच हजार रुपये चा धनादेश सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थित वितरीत करण्यात आला. यावेळी मा. सरपंच शरदराव अरगडे, सचिन अरगडे, उत्तमराव अरगडे, बाळासाहेब बोधक, अमोल अरगडे, बापूसाहेब अरगडे,शिवाजी आरगडे,रामकिसन आरगडे,उत्तमराव आरगडे यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वधु वर यांच्याकडे धनादेश देण्यात आला
सौंदाळा ग्रामपंचायत नेहमीच नाविन्य पूर्ण उपक्रम राबवत असते, त्याप्रमाणे ‘लेक लाडकी सौंदाळा गावची’ कन्यादान योजना सुरू केल्याने नेवासा तालुक्यात सर्वत्र या योजनेचे कौतुक होत आहे.
५०% खर्चात सलुन सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत
५ रु मध्ये थंड व शुध्द २० लिटर पाणी
गावात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत
प्रधानमंञी आवास योजनेचे २७६ तालुक्यात सर्वात जास्त घरकुल मंजुर
दिपावली निमित्त संपुरण गावास मोफत साखर वाटप करणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत
अशा पद्धतीच्या अभिनव उपक्रमांमुळे सौंदाळा ग्रामपंचायत कौतुकास पाञ ठरली आहे