महाराष्ट्र

नांदूर शिकारी येथे यशवंत वनराई उपक्रमाअंतर्गत महिलांनी केले वटवृक्षारोपण..

नांदूर शिकारी येथे यशवंत वनराई उपक्रमाअंतर्गत महिलांनी केले वटवृक्षारोपण..

कुकाणा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यामधील नांदूर शिकारी येथे वटसावित्री पौर्णिमे निमित्ताने मा. नामदार शंकरराव गडाख साहेब,मा.प्रशांत पाटील गडाख मा.सौ. सुनिता ताई गडाख, मा. सौ .जयश्री ताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते मा. उदयनदादा पाटील गडाख यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ यशवंत वनराई ‘ उपक्रमांतर्गत मा. नामदार शंकररावजी गडाख साहेब मित्र मंडळ नांदूर शिकारी तसेच मा. उदयन दादा पा.गडाख मित्र मंडळ नांदूर शिकारी यांच्यावतीने महिलांनी नांदूर शिकारी येथील महादेव मंदिर परिसरात वडाचे झाड लावुन वड पुजन केले. त्याचप्रमाणे लिपने वस्ती आणि मुळक वस्ती येथे देखील वटवृक्षाचे वृक्षारोपण करून पूजन करण्यात आले. या वेळी महिलांना वट वृक्षाचे झाडे भेट देण्यात आली.याप्रसंगी गावातील सरपंच सौ. केशरबाई लक्ष्मण सरोदे, सौ .कुसुम हरिभाऊ शिरसाठ, सौ. सुनिता दिलीप शिरसाठ , सौ अश्विनी संदीप शिरसाठ , सौ.द्वारकाबाई किसन शिरसाठ, सौ .मीराबाई बाबासाहेब शिरसाठ,सौ.हिराबाई रामकिसन लिपने, सौ.अनिता विश्वनाथ लिपने, सौ.कडूबाई अशोक लिपने. सौ.रंजना भगवान शिरसाठ, सौ. संगीता अर्जुन बेडके , सौ.आशाबाई जयलिंग वेल्हाळ सौ. पार्वतीबाई भाऊसाहेब उभेदळ, सौ स्वाती भास्कर मुळक,सौ.आशाबाई कैलास लिपने. सौ सखुबाई माणिक लिपने, सौ. संगीता उत्तम लिपने , सौ.सविता सुदाम लिपने, सौ.कोमल अजित लिपने , सौ. वर्षा विलास लिपने, सौ. प्रिया चंद्रशेखर लिपने, सौ. वैशाली आप्पासाहेब पवार , कार्यकर्ते मा.राजेंद्र सरोदे उपसरपंच संतोष लिपने विलास लिपने ,हरिभाऊ शिरसाठ ,दत्तात्रय टिमकर , रमेश पा. लिपने, गोरक्षनाथ पा. राजमाने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय कडूचंद राजमाने ,संदीप लिपने ,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. भास्कर महाराज मुळक ,भाऊसाहेब उंदरे ,गुंड सर , रवींद्र लिपने , प्रा. संदीप शिरसाठ ,जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दहातोंडे सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद ,महिला भगिनी ,युवक ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे आयोजन यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फाउंडेशन यांचे वतीने प्रा. संदीप शिरसाठ यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!