सोनई-गणेशवाडी येथे आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

गणेशवाडी येथे आमदार गडाखांच्या उपस्थितीत संभाजी महाराज जयंती साजरी
सोनई(वार्ताहर)गणेशवाडी येथे आज छत्रपती ग्रुप आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते पुजन व आरती सोहळ्यास शिवभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी प्रवरासंगम येथून आणलेल्या कावडीच्या पाण्याने पुतळ्यास जलाभिषेक घालण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष डाॅ.अक्षय लोहकरे यांनी प्रास्ताविक केले.
ऐश्वर्या अनिल तांदळे या शालेय विद्यार्थीनीने छत्रपती बद्दल माहिती दिली. आमदार गडाख यांनी उपस्थित युवकांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे स्वागत करुन गावाकरीता असेच चांगले उपक्रम करीत रहा चांगल्या कामाला नेहमी सहकार्य राहील असे सांगितले.
कार्यक्रमास मंडळाचे मार्गदर्शक व सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रेय लोहकरे,नारायण दहिफळे,मधुकर दरंदले,माजी सरपंच कृष्णा तांदळे,अशोक महाराज नरवडे,भारत महाराज लोहकरे,रामकिसन पालवे, तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल बडे, पोलीस पाटील संजय दहिफळे,
सरपंच कैलास दरंदले,अनिल तांदळे उपस्थित होते.सायंकाळी शिवशाहीर कल्याण काळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला.राजेंद्र लोहकरे यांनी आभार मानले. महाप्रसाद वाटपाने जयंती सोहळ्याची सांगता झाली.