महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी चंद्रशेखर पाटील यांचे नियुक्ती…….

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी चंद्रशेखर पाटील यांचे नियुक्ती…….
नेवासा –
मूलतः सिने क्षेत्रातील असणारे चंद्रशेखर पाटील यांनी आतापर्यंतच्या सिनेमा क्षेत्रातील वाटचालीमध्ये मराठी, हिंदी, साउथ सिनेमा आणि मराठी, हिंदी मालिका असे एकूण 45 प्रोजेक्ट मध्ये चंद्रशेखर कडू पाटील यांनी काम केले असून 2020 पासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ काम करण्यात त्यांनी चांगलाच हातखंडा बसवला आहे त्याच अनुषंगाने आणि कामाचा वेग पाहता व कामाची हातोटी पाहता तालुका अध्यक्ष, जिल्हाउपाध्यक्ष, राज्य सचिव अशा अनेक पदभार स्वीकारत त्यांनी पक्ष वाढीचे जिल्हा तसेच राज्यभर काम केले आहे.आणि त्याचीच पावती म्हणून आता त्यांना राज्य कोअर कमिटी मध्ये घेऊन राज्य सरचिटणीस हे पद प्रदेशाध्यक्ष विद्याताई कदम यांनी बहाल केली आहे. पद भार मिळाल्यानंतर माध्यमांशी चंद्रशेखर पाटील म्हणाले की, मी यामागेही काँग्रेस पक्षासाठी व कला क्षेत्रासाठी अहोरात्र झटत होतो आणि यापुढेही दुपटीने काँग्रेस पक्ष वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार असून कला क्षेत्रातील कलाकारांना महाराष्ट्रभर न्याय मिळवून देण्याचे काम मी माझ्या पदाच्या माध्यमातून करणार आहे. चंद्रशेखर पाटील हे हाक मराठी अर्बन निधी या बँकेचे संचालक असून बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांचे त्यांनी कर्ज वितरण करून, वेळोवेळी सर्वसामान्यांच्या मदतीला उभे राहणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सांस्कृतिक सेल च्या माध्यमातून वेगवेगळ्या भागातून अनेक कलाकारांना जोडण्याचे काम चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे. आणि त्यांच कामाची पावती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई कदम यांनी त्यांचे कौतुक केले व अभिनंदन करून त्यांनाही जबाबदारी दिली आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केले आहेत व विद्याताई कदम म्हणाले की चंद्रशेखर कडू पाटील हे यापुढेही पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर काम करणार आहेत ,याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. चंद्रशेखर पाटील हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असून काँग्रेस पक्षांला त्यांचा मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या याच एकनिष्टतेमुळे प्रदेशाध्यक्षा विद्याताई कदम यांनी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून मध्या प्रदेश मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तेथे प्रचारासाठी निवड केली आहे. कोअर कमिटी मध्ये निवड आणि प्रदेश सरचिटणीस या निवडीचे प्रदेशाध्यक्षा विद्याताई कदम, माझी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच नेवासा तालुका अहमदनगर जिल्हा आणि राज्यभरातून चंद्रशेखर पाटील यांना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.