*शासकीय योजनांची जत्रा*

शासकीय योजनांची जत्रा
शेवगाव- प्रतिनिधी असिफ सय्यद (महाराष्ट्र 7 न्यूज )
शासन आपल्या दारी या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून सरकारी लाभाच्या योजना आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात वेळापत्रकानुसार आपल्याच गावात शासकीय अधिकारी येणार आहेत त्या दिवशी आपल्या । तहसीलदार वाघ साहेब गुरव सर, दिवाण सर गटविकास अधिकारी साहेब, तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक सर्व तालुक्यातील सेवा केंद्र आधार केंद्र चालक व सर्व कर्मचारी वर्ग यात सहभागी
अनुदानित योजना, त्याचबरोबर शासकीय दाखले, शालेय दाखले ,उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड दुरुस्ती, नवीन रेशन कार्ड अन्नसुरक्षा योजना, अंत्योदय योजना, संजय गांधी निराधार योजना, कुक्कुटपालन, शेळीपालन, गाय गोठा ,त्याचबरोबर कृषी योजना, मागेल त्याला तळे, फळबाग योजना, ट्रॅक्टरची अवजारे, आरोग्याचा योजना, रस्ते व पाणी_ विषयीच्या समस्या सर्व जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या साठी अधिकारी वर्ग आपले ग्रामपंचायत मध्ये येणार आहेत, सर्व ग्रामस्थांनी आपल्या गावात लाभ घेण्यासाठी उपस्थित राहून आपल्या अडीअडचणी समजावून सांगून त्यामध्ये _घरकुल योजना शबरी योजना रमाबाई घरकुल योजना अशा विविध प्रकारच्या योजनेचा लाभ_ घेण्यासाठी आपापल्या गावच्या वेळापत्रकानुसार हजर राहून अर्ज करावेत. सदर आपल्या अर्जाचे त्याच दिवशी निराकरण न झाल्यास सदर योजना मंजूर करण्यासाठी शासन स्तरावर अधिकारी यांच्याशी संवाद साधून वेळेनुसार योजनेचा लाभ घ्यावा.