राजकिय

८० कोटींच्या विकासकामांना स्थिगितीमुळे ब्रेक – आ शंकरराव गडाख.

देवसडेत ४ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न...

८० कोटींच्या विकासकामांना स्थिगितीमुळे ब्रेक –
आ शंकरराव गडाख.
देवसडेत ४ कोटी ८६ लक्ष
रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न.

नेवासा – ( महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

नेवासा तालुक्यातील देवसडे ता नेवासा येथे चिलेखनवाडी ते देवसडे पुलाचे बांधकाम करणे २ . ३८ कोटी रु,देवसडे ते भातकुडगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणं करणे २.४४ कोटी रु,शनी मारुती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे ३ लक्ष रु
एकूण ४ कोटी ८६ लक्ष रु या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी बोलतांना आ शंकरराव गडाख म्हणाले देवसडे, चिलेखनवाडी परिसरासाठी महत्वाचे असणारे रस्त्याचे ,पुलाचे व शनी,मारुती मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे हे कामे पूर्णत्वास येत आहेत ही समाधानाची बाब आहे.
नेवासा तालुक्यातील गावा ,गावात रस्ते व इतर सार्वजनिक कामे मार्गी लावून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे
मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधीमुळे
प्रश्न सोडवता आले.
विशेष प्रयत्नपूर्वक मंजूर केलेले ८० कोटी रुपयांचे कामे स्थगितीत अडकली असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे नेवासा तालुक्यातील विकासकामांना खीळ बसली आहे.
अनेक कामे स्थगितीत अडकली असल्याने विकासकामे होण्यास अडचणी निर्माण होत आहे.
कितीही अडचणी आल्या तरी आपल्या सर्वांच्या सहकार्याने जास्तीत, जास्त कामे पूर्णत्वास आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत यास आपली साथ आवश्यक आहे.
तालुक्यातील विरोधकांनी कितीही विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरीही जनतेच्या पाठबळावर आपण सदैव कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ शंकरराव गडाख म्हणाले.
याप्रसंगी
सोपानराव घोडेचोर यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मच्छिंद्र
म्हस्के, बाळासाहेब उगले,बबनराव पिसोटे,संजय सावंत,सरपंच भाऊसाहेब सावंत,चेअरमन माणिकराव होंडे,बाजार समितीचे संचालक दौलतराव देशमुख,उपसरपंच सोमनाथ कचरे, अशोकराव गर्जे,अरविंद घोडेचोर,विठ्ठल घोडेचोर,राजेंद्र उगले,शिवाजी घोडेचोर,शिवाजी उगले,दत्तात्रय काळे,नवनाथ घोडेचोर,सचिन घोडेचोर,अभिजित उगले,महेश गणगे,बाळासाहेब पोळ आदींसह देवसडे,चिलेखनवाडी परिसरातील ग्रामस्थ,विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

…………,……………………………………………
आ शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक ८० कोटींच्या कामांना मंजुरी मिळवली होती सदर कामांना सरकारने कुठलेही कारण नसतांना स्थगिती दिली असल्याने
नेवासा तालुक्यातील गावा गावात सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप दिसून येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!