महाराष्ट्र

आईवडीलांचा आदर करून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा करणे हेच मुलांचे आद्य कर्तव्य-हभप उध्दवजी महाराज मंडलिक.

देवसडे येथील श्रीमद भागवत कथा सोहळयाची श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या किर्तनाने व संतपूजनाने सांगता..

आईवडीलांचा आदर करून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा करणे हेच मुलांचे आद्य कर्तव्य-हभप उध्दवजी महाराज मंडलिक

नेवासा –  (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

नेवासा तालुक्यातील देवसडे येथील वारकरी संप्रदायातील सेवेकरी वैकुंठवाशी सौ.जयाबाई फटांगरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित श्रीमद भागवत कथेची सदगुरू नारायण गिरीजी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या किर्तनाने व संतपूजनाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.आई वडिलांच्या सेवेने जीवनात सदगती व सन्मान प्राप्त होतो,त्यांचे मोठे ऋण आपल्यावर आहे ते ऋण न फिटणारे असून धर्म जात नसणारे आई हे स्वतंत्र तत्व असून
आपल्याला घडविणाऱ्या आईवडीलांचा आदर शेवटच्या श्वासापर्यंत करून त्यांची सेवा करणे हेच मुलांचे आद्य कर्तव्य
असल्याचे प्रतिपादन हभप उद्धवजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी आयोजित कीर्तन सोहळा व संतपूजन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक संतसेवक बजाबा पाटील फटांगरे, गायनाचार्य हभप माऊली महाराज फटांगरे,सोपानराव फटांगरे, ऋषिकेश महाराज फटांगरे यांच्या हस्ते उपस्थित संत महंत वारकरी संप्रदायातील गायनाचार्य, मृदुंगाचार्य वारकरी यांचा संतपूजनाद्वारे सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलतांना हभप महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक म्हणाले की आई वडील हे भूतलावरील दैवते आहे त्यांच्या सेवेने मनुष्य जीवनाची खरी फलश्रुती होते,आपल्याला घडविणाऱ्या आईवडीलांचा आदर व सेवा ही शेवटच्या श्वासापर्यंत करणे हेच मुलांचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजमाता जिजाऊंनी केलेल्या संस्काराचे उदाहरण दिले.संस्कार देणारी आई ही एक तत्व असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी झालेल्या कीर्तन व संतपूजन सोहळयाच्या प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज,हभप बाबाजी महाराज चाळक,टीव्ही स्टार श्री ज्ञानेश्वर महाराज तांबे, शिवशाहीर कल्याण महाराज काळे,मृदुंगाचार्य ह.भ.प.लतीफ महाराज शेख,मृदुंग भूषण केशव महाराज जगदाळे,गायनाचार्य प्रकाश महाराज कातकडे,रामेश्वर महाराज सुपेकर, तुकाराम महाराज राऊत, दिलीप महाराज मुळे, देविदास महाराज आढाव,नामदेव महाराज घाडगे,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, अँड. देसाई देशमुख,युवा नेते उदयनदादा गडाख, श्रीधर महाराज घाडगे,गहिनीनाथ महाराज आढाव,ज्ञानेश्वर माऊली शिंदे,सोपान महाराज पाटील,माऊली महाराज सुडके,हभप नवनाथ महाराज काळे, दादासाहेब दरंदले, शिवसेनेचे रामदास गोल्हार,बबनराव पिसोटे,कृष्णा महाराज पिसोटे, महिला कीर्तनकार हभप सौ.जयाताई महाराज घाडगे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के,बाबासाहेब गोल्हार यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!