महाराष्ट्र

गिडेगाव येथील संत दर्शन व संत पूजन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसाद..

राष्ट्राच्या उन्नतीसाठी व गावाच्या विकासासाठी माणूस म्हणून एकत्रित या -गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज...

गिडेगाव येथील संत दर्शन व संत पूजन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसाद..
राष्ट्राच्या उन्नतीसाठी व गावाच्या विकासासाठी माणूस म्हणून एकत्रित या -गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज…

नेवासा प्रतिनिधी- (महाराष्ट्र 7 न्यूज वृत्तसेवा )

नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील संत दर्शन व संत पूजन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संतसेवक काकासाहेब कर्डीले यांच्या वतीने आयोजित संत दर्शन व संत पूजन सोहळा कार्यक्रमाचे हे १७ वे वर्षे होते.
राष्ट्राच्या उन्नतीसाठी व गावाच्या विकासासाठी माणूस म्हणून एकत्रित या असा संदेश गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी भक्त परिवाराशी सुसंवाद साधतांना दिला.
यावेळी झालेल्या संत दर्शन व संत पूजन सोहळयाप्रसंगी श्री क्षेत्र देवगड श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे गिडेगाव येथील कर्डीले वस्तीवर आगमन होताच तोफांची सलामी देत त्यांचे व भक्त परिवाराचे स्वागत करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी श्री समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबांच्या प्रतिमेचे पूजन गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गोगलगाव येथील हभप
दिनकरजी महाराज मते, मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डीले,अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,चांगदेव महाराज काळे,कृष्णा महाराज हारदे,राजेंद्र महाराज आसने,हभप चावरे महाराज,अशोक महाराज साळुंके,नारायण महाराज ससे,तात्या महाराज शिंदे,सुभाष महाराज देशमुख, राजेंद्र महाराज चोरडिया,पी.आर.जाधव, आदर्श शिक्षक पंडितराव खाटीक,होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे,सेवानिवृत्त नायब तहसीलदार दादासाहेब शेळके,आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले,ज्ञानदेव लोखंडे, राजेंद्र विधाटे, बाळासाहेब निकम,दिनकरराव कदम,देवगडचे सरपंच व सेवेकरी अजय साबळे, संदीप साबळे,सलबतपुरचे सरपंच अजहर शेख,वारकरी सेवक लालाभाई शेख,बाळासाहेब साळुंके,नवनाथ साळुंके,सरपंच भगवानराव कर्डीले,बद्रीनाथ फोलाणे यांच्यासह देवगड भक्त परिवार भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.काकासाहेब कर्डीले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!