सोनईतील छ.शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक दिन साजरा

सोनईतील छ.शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेवासा प्रतिनिधी –
सोनई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सोनई परीसरातील
लोहगाव,शनिशिंगणापुर,घोडेगाव, गणेशवाडी,पानेगाव,मुळा कारखाना येथे विविध उपक्रम राबविण्यात येवून सोहळा साजरा करण्यात आला.
सोनई येथील शिवाजी चौकातील पुतळ्याचे पुजन मंडळाचे सदस्य रणजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष विनायक दरंदले, अशोक शिरसाठ,महावीर चोपडा, ऋषिकेश जंगम,तेजस जोशी, अमन सय्यद,सुनील सानप उपस्थित होते.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येथे मिठाईचे वाटप करण्यात आले. पानेगाव येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुजन शुभम जंगले,विशाल जंगले,बाबासाहेब गुडधे,सरपंच संजय जंगले, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रेय घोलप,सुनील चिंधे,बाळासाहेब नवगिरे उपस्थित होते.
——————————-