महाराष्ट्र
सोनईत ओमशांती परीवाराच्या वतीने पर्यावरण दिन साजरा.

सोनईत ओमशांती परीवाराच्या वतीने पर्यावरण दिन साजरा.
नेवासा प्रतिनिधी –
सोनई येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी विद्यालयाच्या वतीने परीसरात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण उपक्रम राबवून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.केंद्राच्या प्रमुख उषादिदी यांनी पर्यावरण सुरक्षा बाबत मार्गदर्शन करताना पर्यावरणावर मानवाचे जीवन आधारित असल्याने प्रत्येक नागरिकांचे पर्यावरण जपणे कर्तव्य असल्याचे सांगितले.मुळा ग्राहक भांडारचे व्यवस्थापक ओंकार दरंदले,अमोलभाई,अनिलभाई,पुपुगले,शेळके आदी उपस्थित होते.उपस्थित सेवेक-यांनी ओमशांतीनगर परीसरात स्वच्छता अभियान राबवून मोकळ्या जागेत व रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास परीसरातील ग्रामस्थ व भक्तगण उपस्थित होते.
—————————-