कू.ईश्वरी ससे हिचे गुरुवर्य देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराजांकडून कौतुक……

नेवासा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथील गुरुदास भास्करगिरी महाराज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी कु. ईश्वरी नंदकुमार ससे हिच्या दहावीतील यशाबद्दल श्री क्षेत्र देवगड गुरुदेवदत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी केले कौतुक करून सत्कार करून अभिनंदन केले. कु. ईश्वरी ससे ही देवगडचे सेवेकरी हभप नारायण महाराज ससे यांची नात आहे गुरुदास भास्करगिरी माध्यमिक विद्यालयात तिने ८९ २० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला म्हणून गुरुवर्य बाबांचे आशीर्वाद कु. ईश्वरी ने घेतले तिला आशीर्वाद देत पुढील शिक्षणासाठी बाबांनी शुभाशीर्वाद दिले. यावेळी झालेल्या सत्कार समयी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी ऋषिनाथजी महाराज, हभप नारायण महाराज ससे, गणपत महाराज आहेर, संजय महाराज निथळे, नामदेव महाराज कंधारकर, तात्या महाराज शिंदे उपस्थित होते.