आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दयनीय अवस्थे बद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दयनीय अवस्थे बद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ…

नेवासा प्रतिनिधी –  (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथे शाळेच्या सभोवताली मोठाले खड्डे दारूच्या बाटल्या बाटल्यांच्या काचा,ठेकेदाराकडून पडलेल्या सिमेंटच्या जुन्या गोण्या,गवत अशा अवस्थेत शाळेसमोर मुलांचा वावर असतो.
त्यामुळे मुलांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे, शौचालय नाही मुताऱ्या नाही मुलांना खेळण्यासाठी शाळेसमोर जागा नाही.
शाळेच्या वर्गात पावसाचे पाणी शिरते ,ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे .
वेळोवेळी विनंती करूनही या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते त्यामुळे अखेर खेडले परमानंद येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध करत दिनांक 5/7/2023 आमरण उपोषणाचा पवित्र घेतला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद या ठिकाणी गरीब व दलित कुटुंबातील मुले आहे सधन कुटुंबातील सर्व मुले खाजगी शाळेत आहे त्यामुळे गाव पुढाऱ्यांचे या गोष्टीकडे लक्ष नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
मायबाप सरकार या गरीब विद्यार्थ्यांना न्याय देणार का?
असा प्रश्न उपोषकर्ते संभाजी शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!