मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर व सोनई येथील महाविद्यालयामध्ये बीएससी कॉम्प्युटर सायन्स व एम एस सी कॉम्प्युटर एप्लीकेशन साठी प्रवेश प्रक्रिया सुरू…

*मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर व सोनई येथील महाविद्यालयामध्ये बीएससी कॉम्प्युटर सायन्स व एम एस सी कॉम्प्युटर एप्लीकेशन साठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र7न्यूज वृत्तसेवा
आ शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या माध्यमातून नेवासा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती होताना दिसत असून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मुळा एज्युकेशन शिक्षण सोसायटी सोनई येथील व नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयांना बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स व एमएस्सी कॉम्प्युटर एप्लिकेशनला मान्यता मिळाली होती.तसेच विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे व यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावीही जावे लागणार नाही.
त्यानंतर आता बीएससी कॉम्प्युटर सायन्स व एम एस सी कॉम्प्युटर एप्लीकेशन या कोर्स साठी प्रत्यक्षात ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली असून बीएससी कॉम्प्युटर सायन्ससाठी 80 जागा व एम एस सी कॉम्प्युटर एप्लीकेशन साठी 30 जागा भरावयाच्या असून लवकरात लवकर विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयात संपर्क साधावा आपल्या पाल्याचे ऍडमिशन करून घ्यावे असे आवाहन मुळा एज्युकेशन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय व सोनई येथील कला वाणिज्य विज्ञान या दोन्ही महाविद्यालयांमध्ये ही ऍडमिशन प्रक्रिया चालू असून नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सदर कोर्सची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे मुळा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून व्यक्तिगत पाठपुरावा उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केला होता .त्यानुसार प्रत्यक्षात या ऍडमिशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.